“ब्रा” जास्त वेळ घालता?तर नक्की वाचा, सोबत “न्यूड”झोपण्याचे फायदे ही घ्या जाणून….

पुणे, २६ नोव्हेंबर २०२०: हल्लीच्या बदलत्या काळात अनेक कपड्यांचे फॅशन आले आहेत. तसेही आजच्या तरूणाईला फॅशनेबल कपडे घालण्याची सवय झाली आहे.त्यात तरूणी देखील आपलं सौंदर्य कसं खुलून दिसेल म्हणजेच आकर्षक दिसेल यासाठी स्वत:वर अधिक मेहनत घेताना दिसतात आणि त्यातीलच एका कपड्या बद्दल आज आम्ही आरोग्य विषयक काही गोष्टी सांगणार आहोत.

महिलांचा, तरूणींचा सर्वात नाजूक आणि आकर्षक असा भाग म्हणजे त्यांचे स्तन, ज्याची काळजी घेणे महत्वाचे असते. खरतर स्त्रीयांच्या ब्रेस्ट चा हा भाग का वाढतो या वर अजून शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढला नाही. त्यांना ठोस असे पुरावे देखील आभ्यासातून मिळाले नाही. हा भागच स्त्रीयांना अधिक आकर्षक बनवतो.

यासाठी हल्लीच्या तरूणी देखील कपड्यांमधे बदल करताना दिसतात.विशेष म्हणजे ब्रा मधे आज मार्केटमधे अनेक प्रकारचे ब्रा आले आहेत. पण, याचे आरोग्याला फार तोटे आहेत.

१) ब्रा अधिक वेळ वापरलाने ब्रेस्ट पेन,ब्लड सर्क्युलेशनच्या समस्या उद्भवू शकतात.

२) स्तन पेशी डॅमेज होण्याची शक्यता आसते.

३) सतत पाठदुखी जाणवत असेल तर त्याचे कारण ही ब्रा असू शकते.

४)छोटी आणि टाईट ब्रा वापरणा-यांना पाठदुखीचा अधिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

५) २४ तास ब्रा घालण्याने त्वचेवर जळजळ, खाज सुटणे अशा तक्रारीही जाणवू शकतात.

६) कधीकधी अस्वस्थ वाटण्याचे कारण देखील जास्त वेळ ब्रा घालणे असू शकते.

त्यामुळे ठरावीक वेळेसाठी अशा कपड्यांचा वापर करणे गरजेचं असते. नाहीतर मग त्याचा त्रास हा आरोग्याला जाणवतो.

तुम्हाला माहिती आहेत का न्युड झोपण्याचे फायदे….

झोप हि तशी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, सध्याच्या काळात अनेकांना नीट झोप लागत नाही किंवा त्यांना निद्रनाशाचा त्रास चालू होतो. पण, जर तुम्ही न्यूड झोपले तर त्याचे असंख्य असे फायदे आहेत.

१) विनाकपडे झोपल्याने शरीराचे तापमान योग्य राहते.

२) शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा जास्त होते, तेव्हा या स्थितीत शरीरात मेलाटोनिन, हार्मोन्स मधे वाढ होऊ शकते.

३) अश्या सर्व स्थितीना नियंत्रित ठेवण्यासाठी न्यूड झोपणे अत्यंत लाभदायक ठरते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा