वारजे माळवाडी येथे रक्तदान शिबिर, डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

पुणे, दि.२१मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्ताची गरज निर्माण होऊ लागली आहे. हा विचार करून किरण बारटक्के यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिराचे आयोजन किरण बारटक्के यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०९ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी परिसरात ‘डॉक्टर आपल्या दारी ‘ हा उपक्रमही राबवण्यात आला. वारजे माळवाडीतील विविध ठिकाणी ह्या उपक्रमाद्वारे ११२७ लोकांची चाचणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टस्टिंगचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

यासर्व कार्यक्रमाचे आयोजन वारजे माळवाडीचे माजी नगरसेवक किरण बारटक्के व मित्र परिवारांकडून करण्यात आले होते. वारजे माळवाडी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. या सेवेस सहकार्य केलेले डाॅक्टर व त्यांचे सहकारी यांचे बारटक्के यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा