डॉक्टर, आशा भगिनी, संपूर्ण आरोग्य विभागाचे कार्य मानवतेच्या कल्याणाचे -मा. सभापती प्रविण माने

इंदापूर, २ ऑक्टोबर २०२० आज सर्वत्र असणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यारुपात जगावर आलेलं संकट पाहता, जगातील सहसत्ता असणाऱ्या देशांची अवस्था दयनीय झाली आहे. सगळ्यांच्याच आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेल्या असताना, आता प्रत्येक माणसाला आपली जबाबदारी स्वतः घेणे क्रम प्राप्त आहे.

आपल्या सरकारने बऱ्याच उपाययोजना करुनही कोरोनाच्या आजाराचे हे महाकाय संकट आटोक्यात येण्याचे नावच घेत नसल्याने आता, महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्यात आली असून, या उपाययोजनेस यशही येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

गाव, शहर, वाडी, वस्ती पातळीवर नागरिकांच्या सततच्या होत असणाऱ्या चाचण्यांमधून आता कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरेने उपचार करणेही सोयीचे होत असून संपूर्ण महाराष्ट्रातून ही योजना मोठया प्रमाणावर कार्यरत आहे.

आज इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे होत असणाऱ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून मा. सभापती बांधकाम व आरोग्य, तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी वधू-वराचे ऑक्सिजन व पल्सरेट चेकिंग केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमावलीचे तंतोतंत अनुसरून, सोशल डिस्टनसिंगचे पालन करत ह्या शुभकार्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पळसदेव येथे सुरू असणाऱ्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या योजनेंतर्गत नागरिकांची तपासणी सुरू असताना, जि. प. सदस्य प्रविण माने यांनी वधू – वरांची स्वतः तपासणी करत, नागरिकांतून या मोहिमेविषयी जागृती केली. आपला सर्वांचा सहभाग व सहकार्य व जागरूकतेतूनच कोरोना विरोधातील ही लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत, आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या, डॉक्टर, कर्मचारी, आशा स्वयंसेविका या सर्वांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच आज सर्वत्र लोकांना आपल्या जिवाची भ्रांत पडल्याची परिस्थिती असताना आपल्या जीवावर उदार होऊन, डॉक्टर, आशा भगिनी, संपूर्ण आरोग्य विभाग यांच्यावतीने सुरू असलेलं अखंड कार्य हे मानवतेच्या कल्याणाचे आहे, असेही मत यावेळी माने यांनी व्यक्त केले.

आज रोजी संपन्न झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातील वधू व वराची अनुक्रमे शिवांजली लोखंडे व दत्तात्रय आवारे ही नावे असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, ग्रा.प. सदस्य मेघराज कुचेकर, बारामती लोकसभा मतदार संघ अध्यक्ष अँड शुभम निंबाळकर, रा. विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अँड अमरसिंह मारकड, ग्रा. प सदस्य सुजित मोरे, महेंद्र लोखंडे यांच्यासह

पळसदेव आरोग्य सेविका कविता.बी.कांबळे व सुनंदा सुनील कांबळे, शोभा विलास ढावरे, राणी धनाजी बनसुडे, केसर अजुऀन वाघमोडे, छाया दादाराम येडे, रेश्मा भालचंद्र येडे, आश्विनी गोरख साळवे, रत्नमाला विजय भोसले या आशा स्वंयसेविका भगिनी उपस्थित होत्या.

प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा