गोल पोस्ट आरोग्य कुर्डुवाडीत निदाग प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

कुर्डुवाडीत निदाग प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

माढा, दि. ३० आँगस्ट २०२०: देशात आलेल्या संकटावर प्रत्येकानं मात करणं हे आपलं कर्तव्य आहे. या उद्देशाने कोरोनाच्या कालावधीमध्ये जीवाची परवा न करता वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान निदाग नाट्य कला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

या वितरणामध्ये डॉ.सचिन माढेकर, डॉ.मोहसीन मकणू, डॉ.सचिन गोडसे, डॉ.लकी दोशी, डॉ. संतोष कुलकर्णी अशी पुरस्कार प्राप्त योद्धांची नावे आहेत. मान्यवरांच्या हस्ते गुळवेलचे वृक्ष व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, कायदेशीर सल्लागार पी.पी.पाठक, डॉ.संतोष अडगळे, डॉ. रोहिणी कुलकर्णी, निदाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरदीप पंचिरे, सचिव अंकुश आतकर आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिध: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version