गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ”देव माणूस” मालिका सत्य घटनेवर आधारित? पहा संपूर्ण बातमी… 

”देव माणूस” मालिका सत्य घटनेवर आधारित? पहा संपूर्ण बातमी… 

मुंबई, दि. ३० ऑगस्ट २०२०: येत्या ३१ ऑगस्ट २०२० पासून झी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तसेच  ही मालिका ३१ ऑगस्ट २०२० पासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘देवमाणूस’ ही एक सायको थ्रिलर मालिका आहे. जर तुम्ही सायको थ्रिलर्सचे चाहते असाल तर झी मराठीची ‘देव माणूस’ नावाची आगामी मालिका तुम्हाला नक्कीच झपाटून टाकेल. झी मराठीच्या या आगामी थ्रिलर शोचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून उत्सुकतेसोबतच त्याच्यावर “हे इतके भयानक कसे काय दाखवताय?” असे ट्रोलिंग ही झालेय.

देव माणूसची कथा एका सिरीयल किलरची आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या किलरला त्याचे पेशंट मात्र देवदूताप्रमाणे समजतात. अशा विचित्र कथानकासह, या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर हा डार्क सायको थ्रिलर कसा सादर करणार हे पाहणे फारच रोमांचकारी ठरेल.

तसेच ‘देव माणूस’ चे कथानक हे एका डॉक्टरच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहे. एरवी जो एखाद्या सभ्य माणसाप्रमाणे वागतो आणि आपल्या निष्पाप चेहऱ्याखाली आपले भयानक रहस्य लपावतो. सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात प्रसिद्ध असलेला डॉ. संतोष पोळ नावाचा हा  डॉक्टर ज्याने स्वतः ३ आणि आपल्या प्रेयसी नर्स ज्योती मांढरेच्या मदतीने केलेल्या इतर सर्व खुणांबद्दलही पोलिसांना कबुली दिली होती.

‘देव माणूस’ची कथा याच डॉ. पोळच्या भोवती फिरते. हा डॉ. इंटरनेटवर डॉ. डेथ या नावानेही प्रसिद्ध आहे. झी मराठी शोमधील या सीरियल किलर डॉक्टरची भूमिका लागिरं झालं जी मालिका फेम अभिनेता किरण गायकवाड निभावतोय. ‘देव माणूस’ ही सिरीयल लवकरच समाप्त होणाऱ्या झी मराठीवरील लोकप्रिय हॉरर शो रात्रीस खेळ चालेच्या जागी प्रसारित होणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिध: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version