गोल पोस्ट इतर राजकारण ‘मराठीहृदयसम्राटाचा’ नवा ‘डँशिंग लुक’ तुम्ही पाहिलात का ?

‘मराठीहृदयसम्राटाचा’ नवा ‘डँशिंग लुक’ तुम्ही पाहिलात का ?

मुंबई, दि. ३० ऑगस्ट २०२०: ग्रे टी-शर्ट, ब्लॅक जीन्स, ब्लॅक गॉगल, ब्लॅक हेअर, व्हाईट कॅजुअल शूज, ब्लॅक अँड व्हाईट दाढी अन् तेवढ्याच स्वॅगमध्ये हाताची घडी घातलेला एक सेलिब्रिटी… नाही,नाही… आम्ही कोणत्या फिल्मस्टार बद्दल नाही बोलत आहोत. तर हे वर्णन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं… नेहमी पारंपारिक पेहराव्यात किंवा सफेद सदऱ्यामध्ये दिसणारे राज ठाकरे आज नव्या लूकमध्ये दिसले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सदैव लोकप्रिय असणारे नेते आहेत. आपल्या ठाम भूमिकेमुळे आणि भाषणांमुळे ते महाराष्ट्रातील जनतेची मनं जिकंतात, म्हणूनच अनेकजण त्यांना ‘मराठीहृदयसम्राट’ मानतात. आज राज ठाकरेंचा नवा फोटो इंटरनेटवर आला आणि तो प्रचंड शेयर केला जातोय. खासकरून मनसैनिक तर राज ठाकरेंच्या या नव्या लूकचे दिवाने झाले आहेत. यावरूनच राज ठाकरेंची लोकप्रियता दिसून येते.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सलून्स बंद असल्यानं अनेकांनी घरीच केसं कापले, दाढी केली, काहींनी तर टक्कलही केलं. नवा लुक ट्राय करण्यासाठी लॉकडाऊनचा अनेकांनी पुरेपूर वापर केला. मात्र राज ठाकरेंचा हा नवा लूक त्यांना चांगलाच सूट होत असून इतर कोणत्याही नेत्यापेक्षा ते यात डँशिंग दिसतायत एवढं मात्र नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

error: Content is protected !!
Exit mobile version