डॉक्टर पत्नीने मुलांची व पतीची हत्या करून केली आत्महत्या

नागपूर, १९ ऑगस्ट २०२०: नागपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर पत्नीने आपल्या प्राध्यापक पतीसह आपल्या दोन मुलांना इंजेक्शन देऊन ठार मारले व त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जण मृत्युमुखी पडल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सुषमा राणे सह्या महिला डॉक्टरचं नाव होतं.

अद्याप या आत्महत्येचे कारण समजू शकलेलं नाही. परंतु या घटने दरम्यान त्यांची आत्त्या प्रमिला या घरातच होत्या. सुषमा राणे यांनी आपल्या पतीला व मुलगी व मुलगा या दोघांना इंजेक्शन दिले त्यानंतर त्यांनी स्वतः पंख्याला गळफास घेतला.  प्रा. धीरज डिंगाबर राणे (वय ४२), त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (वय ३९), मुलगा ध्रुव धीरज राणे (वय ११), मुलगी लावण्या ऊर्फ वण्या धीरज राणे (वय ५) , अशी मृतकांची नावे आहेत. धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या.

राणे दाम्पत्यासोबत धीरज यांची ६५ वर्षीय आत्या राहते. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी आवाज दिला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रमिला यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवून खोलीचा दरवाजा उघडला असता धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले तर पंख्याला डॉ. सुषमा गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा