इंदापूर, दि. १ जुलै २०२०: डॉक्टर दिनानिमित्त भिगवण रोटरी क्लबच्यावतीने लॉकडाउन व कोरोना या महामारीच्या काळात भिगवण परिसरातील डॉक्टरांनी रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे एरव्ही देखील डॉक्टर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णांची सेवा करत असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लबने कार्यक्रमाचे आयोजन केले.
दुर्गामाता मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास भिगवण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संकेत मोरे, डॉ.चंद्रकांत खानावरे, डॉ.अतुल कोठारी डॉ. माधवराव नाईक निंबाळकर, डॉ. शैलेश दोशी, डॉ. भारत भरणे, डॉ.रामराव हागारे, डॉ.एल.जी.शहा, डॉ.अमोल खानावरे, डॉ. विकास हगारे, डॉ. युवराज गोडसे, डॉ. जयप्रकाश कराड, डॉ. जयश्री गांधी, डॉ. प्राची थोरात, डॉ.पांडुरंग जिरगे, डॉ. वैशाली ढोले, डॉ.सतीश नागरे, डॉक्टर पाटील, डॉ. धनंजय धायगुडे, रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष संपत बंडगर, सचिव दिपाली भोंगळे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, महेश शेंडगे, कमलेश गांधी, प्रदीप वाकसे, औदुंबर हुलगे, संजय खाडे, संजय चौधरी, नामदेव कुदळे, डॉ. अमोल खानावरे, मीना बंडगर आदी यावेळी उपस्थित होते. रोटरीने केलेल्या सन्मानाबद्द्ल डॉक्टर वर्गाने देखील समाधान व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे