गोल पोस्ट राष्ट्रीय दोघांच्या भांडणात कोंबड्याची हत्या

दोघांच्या भांडणात कोंबड्याची हत्या

कैमुर : बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती ठाण्‍याच्‍या परिसरात शेजार्‍यांच्‍या भांडणात एका कोंबड्‍याचा जीव गेला. परंतु आश्‍चर्य वाटण्‍यासारखी घटना आहे, पण ही घटना सत्य आहे. दोघांच्‍या भांडणात कोंबड्‍याची हत्‍या झाल्‍याचे समोर आले आहे.
याप्रकरणी बिहारचे पोलिस देखील आश्‍चर्य व्‍यक्‍त करत आहेत. या प्रकरणाचा निकाल काय द्यायचा या विवंचनेत सध्या बिहार पोलिस आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांविरोधात तक्रार नोंदवण्‍यात आली आहे. कोंबड्‍याचा हत्‍येचे प्रकरण या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
पीएम रिपोर्टमध्‍ये कोंबड्‍याच्‍या मानेवर ब्लेडने कापल्‍याचे निशान आढळल्‍याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दुर्गावती ठाण्‍याच्‍या परिसरातील तिरोजपूर गावात कमला देवी राहतात. कमला देवी यांचे शेजार्‍यांशी भांडण सुरु होते. दोन दिवसापूर्वी दोन परिवारामध्‍ये अशीच जोरात वादावादी झाली होती . या वादात शेजार्‍याने कमला देवींचा कोंबडा पकडला आणि त्‍याला मारुन टाकले. तसेच आरोपीने कमला देवी आणि त्‍यांच्‍या मुलास बेदम मारहाण केली.
मोहनियाचे पोलिस उपाधीक्षक रघुनाथ सिंह यांनी सांगितले की, कमाला देवीची फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. कोंबड्‍याचे पीएम दुर्गावती पशु दवाखान्‍यात करण्‍यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version