देशांतर्गत हवाईसेवा २५ मे पासून सुरू होणार : हरदीप पुरी

10

नवी दिल्ली, दि.२१ मे २०२०: देशांतर्गत विमान सेवा २५ मे पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. त्यामुळे हवाई वाहतूकही सुरू होण्याची चिन्हे केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

याबाबत हरदीप पुरी यांनी सांगितले की, सोमवार २५ मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होतील. याबाबत सर्व विमानतळांना सूचना दिल्या जातील. प्रवाशांसाठी ‘SOP’ देखील जारी करण्यात येत आहे. २५ मे पासून टप्प्याटप्प्याने या विमानसेवा सुरू केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

याशिवाय स्थानिक स्वरूपाची उड्डाणे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट केले होते. देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केवळ नागरी विमान उड्डाण मंत्रालय, भारत सरकार किंवा केंद्रच घेऊ शकत नाही. तर सहकारी संघवादाच्या भावनेने राज्य सरकार देखील परवानगी देण्यास तयार असावी जेथून विमाने टेक ऑफ आणि लँड करतील. असेही त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: