नवी दिल्ली, दि. २ मे २०२०: लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळाला आहे. १९ किलो आणि १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर स्वस्त झाले आहेत. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. कर दर राज्यात वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीची किंमत बदलते.
१४.२ किलो गॅस चे नवीन दर:
आयओसीएल वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४.२ किलोग्राम विना अनुदानित एलपीजी सिलिंडर १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. यानंतर याची किंमत ५८१.५० रुपये झाली आहे, जी आधी ७४४ रुपये होती. कोलकोत्यामध्ये त्याची किंमत ७७४.५० रुपयांवरून ५८४.५० रुपयांवर आली आहे, मुंबईत ती ७१४.५० रुपयांवरून ५८९ रुपयांवर आली आहे. तर चेन्नईमध्ये पूर्वी ७६१.५० रुपये होती जी आता ५६९.५० रुपये झाला आहे.
१९ किलो गॅस चे नवीन दर:
दिल्लीतील १९ किलोचे सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर याची किंमत १०२९.५० रुपये झाली आहे, जी आधी १२८५.५० रुपये होती. कोलकातामध्ये त्याची किंमत १३४८.५० रुपयांवरून घसरून १०८६ रुपये झाली आहे, मुंबईत ते १२३४.५० रुपयांवरून खाली ९७८ पर्यंत खाली आले आहेत. चेन्नईमध्ये पूर्वीचे १४०२ रुपये होते, ते आता ११४४.५० रुपये झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी