वॉशिंग्टन, १७ डिसेंबर २०२०: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेचा विषय ठरत होते. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही ट्रम्प प्रसिद्धी मधे आसायचे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयीच एक धक्कादायक विधान एका अभिनेत्री ने केलं आहे. ज्यामुळे आता नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टिका करताना अभिनेत्रीची जीभ घसरली आणि तिने आक्षेपार्ह ट्विट केले. अभिनेत्रीचे नाव डेबरा मिसिंग असून आमेरिकतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अमेरिकन टिव्हीवर विल अँड ग्रेस या सिरिजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीने ट्विट केले आहे.
‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्कार झाला पाहिजे’अश्या अर्थाचे ट्विट तिने केले.”तुम्ही एक मुर्ख, घाबरट, चुकीचे, बेजबाबदार, खोट्या मनोवृत्ती चे आणि गुन्हेगार आहात. मला आशा आहे की तुम्ही दिर्घ काळासाठी जेलमध्ये जाल आणि तिकडच्या कैद्यांचे “प्रिय” बनाल”. डेबराच्या या ट्विटचा अर्थ सरळ सरळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्कार किंवा लैंगिक शोषण व्हावं आसा निघतो.असं नेटकर्यांनी सुनावले.
काही काळापुर्वीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदा साठी निवडणूका पार पडल्या आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला मात्र त्यांच्या भोवती होणार्या वादग्रस्त विधानांचे सत्र मात्र काही थांबायचे नाव घेत नसून आता त्यात या अभिनेत्रीची भर पडली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव