इराण : अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी मारला गेला. यानंतर दोन्ही देश आमनेसामने उभे आहेत.
दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांना धमक्या दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही ट्रम्प यांच्या शीरच्छेद करण्यासाठी ८ कोटी डॉलर (सुमारे ५ ७६ अब्ज रुपये) रकमेचे बक्षीस जाहीर केले आहेत.
जनरल कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारावेळीच हे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या सर्व नागरिकांनी प्रत्येकी १ डॉलर दान करावा. त्यातून ८ कोटी डॉलर डोनाल्ड ट्रम्प यांचा शीरच्छेद करणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी इनामाच्या वृत्तानंतर पुन्हा एकदा इराणला धमकावले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. इराणने अमेरिकन व्यक्ती वा ठिकाण लक्ष्य केल्यास त्यापेक्षा अधिक जहालपणे त्यास प्रत्युत्तर देऊ असे ट्रम्प यांनी नमूद केले.