डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदींकडून नववर्षाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी सोमवारी (दि.६) रोजी सायंकाळी ट्रम्प यांना फोन केला.
यावेळी दोघांनीही एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, भारत-अमेरिका संबंधांवरही यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध आधीपेक्षा मजबूत झाले आहेत, एकमेकांवरील विश्वासामुळे ते आणखी दृढ होत आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.
मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळात संबंध मजबूत झाले आहेत. जे एकमेकांवरील विश्वासामुळे आणखी घट्ट होतील.

२०१९ मध्ये दोन्ही देशांनी खूप प्रगती केली. ज्यामुळे दोन्ही देशांची मैत्री घट्ट झाली आहे, असं मोदी म्हणाले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधानांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले होत असल्याचं सांगितलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा