दोनशे वीज चोरांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर : वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी कार्यालयाने वीज चोरीविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यात अनधिकृत वीजजोड व वीजचोरी करणाऱ्या २०० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक प्रकारचे साहित्य मोठया स्वरूपातजप्त करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरीचे धक्कादायक प्रकार पाहून अधिकारी देखील अवाक झाले. ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध भागातील वीज वितरण कंपनीचे सुमारे ७५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कार्यकारी अभियंता मनिषकुमार सूर्यवंशी यांनी या मोहिमेचे पूर्ण नियोजन केले.
१० पथके शहर व तालुक्यात मोहिमेसाठी कार्यरत होते. शहरांमध्ये हीटर, गिझर,ज्यादा क्षमतेची उपकरणे क्षमतेचे उपकरणे वापरली जाऊन तेवढ्या पद्धतीचे बिल मिळत नव्हते.
हीटर, गिझर, रूम हीटर यांचे मीटर मधून जोड आकडे टाकून वीज घेणे, थकीत बिल जेथे वीज तोडली, त्या घरात वीज देणे, कमी पॉईंट दाखवून जास्त वीज वापर आदी प्रकार आढळले. प्रत्येक घरातील मीटर एकूण पॉईंट विद्युत उपकरणे आदींचा अभ्यास करून वीज बिलाशी पडताळणी केली जात आहे.
गैरमार्गाने वीज वापरणाऱ्या ग्राहकाला नोटीस बजावून दंडात्मक कारवाईची रक्कम बँकेत भरण्यास सांगितले जाते. या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे, कुकडे ,सहाय्यक अभियंता एच. एस. ठाकूर, हरिचंद्र पोपळघट, प्रिया मुंडे, मयूर जाधव, विष्णू घोडके, नितीन खेडकर, भाऊसाहेब पाटील, सुर्दशन शिरसाट, विष्णू सोनवणे, एस.पी. भगत, अर्जुन बडे, बाळू किर्तने आदिसह अधिकारी कर्मचारी पथकाचे प्रमुख उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा