कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : प्रविण माने

इंदापूर, दि.१८ मे २०२० : कोरोनाने इंदापूर तालुक्यात शिरकाव केला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार नागरिक आपापल्या गावी आल्याने हा त्रास तालुक्यातील शिरसोडी येथील २ नागरिकांना झाला. पुणे, मुंबई तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणाहूनही नागरिक तालुक्यात आले असल्याने यांच्यापैकी कुणी बाधीताच्या संपर्कात आले असतील तर विषाणूचा फैलाव होऊ शकतो.

मुबंईहुन गावी आलेल्या २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाव हादरून गेले होते. या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना योग्य त्या सुचना केली असल्याची माहिती माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी दिली.

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना कोणीही घाबरून न जाता घरीच थांबण्याचेही आवाहन केले. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा भगिनी, पोलीस यांच्या सातत्यपूर्ण कामगिरी विषयी प्रविण माने यांनी आभार मानले.

आज शिरसोडी येथे दिलेल्या प्रविण माने यांसह गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ राजेश मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ , सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा