मानसिक थकवा नको रे बाबा….

4

पुणे, २६ ऑगस्ट २०२२: दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर एक क्षण असा येतो की, आता मनाला थांबायची सूचना करावीशी वाटते. यालाच मानसिक थकवा किंवा फटिग असं म्हणतात. एका क्षणाला अशी परिस्थिती येते की, एकवेळ शारिरीक अंग मेहनत परवडली पण मानसिक थकवा नको.

शरीरापेक्षा मेंदू जास्त थकतो, असं मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. मेंदूवरील अनेमिल नावाच्या द्रव्याचा स्त्राव वाढला की मेंदू थकू शकतो, असं शास्त्रज्ञांच्या निष्कर्षातून समोर आलं आहे. हा स्त्राव वाढू न देणं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे.

१. मनाच्या विकासासाठी शारीरिक व्यायामाची गरज आहे. शरीराच्या व्यायामामुळे मनाला शांतता मिळते.

२. मनाला प्रसन्न करण्यासाठी छान आवडती गाणी ऐका.

३. जोक्स, विनोदी किस्से ऐका.

४. रोज प्राणायाम करा. जेणेकरुन मनाचा व्यायाम होईल. प्राणायाम कायम मनाला प्रफुल्लित करतो.

५. मेडिटेशन शिका. रोज नियमितपणे मेडिटेशन करा.

६. महिन्यातून एकदा जागापालट करा. एखादी ट्रिप करा. त्याचा मनावर खूप चांगला परिणाम होतो.

७. आवडता छंद जोपासा. त्यातून मनाला आनंद मिळून त्यातून मनावरचा ताण कमी होईल.

८. आवडते पदार्थ खा. तसेच आवडते पदार्थ तयार करुन त्यातून आनंद मिळवा.

९. आवडती पुस्तके वाचा. त्यातून मिळणारा आनंद तुमचै नैराश्य दूर करेल.

१०. सहा महिन्यातून एकदा तरी स्ट्रेस टेस्ट करा. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती समजू शकेल.

सध्याचे जग हे धावपळीचे असल्याने मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे. ज्यामुळे मानसिक ताण-तणाव किंवा फटीग येऊ शकतो. वरील उपायांनी तुम्ही घरबसल्या मनाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न नक्की करु शकाल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा