गोल पोस्ट गुन्हा नराधमांची वासना वृद्धेलाही सोेडेना, ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार….

नराधमांची वासना वृद्धेलाही सोेडेना, ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार….

केरळ, ५ ऑगस्ट २०२०: भारतात कोरोना कळात देखील बलात्काराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहे. ज्यामध्ये आज घडीला देखील अशा विकृतीचे चेहरे बघायला मिळत आहे. तर आता समोर आलेली घटना हि कुठल्या मुलीवर , तरुणीवर नाही तर चक्क एका वृद्घेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केरळच्या एर्नाकुलम मध्ये एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल केले असून तिची तब्येत ही गंभीर असल्याची माहिती कळत आहे. त्या बरोबरच पोलिस हे आरोपीचा शोध घेत आहेत. वृद्ध महिलेवर बलात्कार करणारा व्यक्ती हा तिचा परिचयाचा अासावा असा प्राथमिक आदांज वर्तविला जात आहे.

तसेच महिलेचे वय हे जास्त असल्यामुळे तिला विसरण्याचा आजार झाला आहे. ज्यात ती आरोपीची पुर्ण माहिती व्यवस्थितपणे देऊ शकत नाहीये. तर मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचा तपास करण्यात पोलिसांना अडथळा निर्माण होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version