गोल पोस्ट इतर लाईव्ह अपडेट अयोध्या लाईव्ह अपडेट: पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्या मध्ये दाखल

अयोध्या लाईव्ह अपडेट: पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्या मध्ये दाखल

आयोध्या, ५ ऑगस्ट २०२० : नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे आयोध्यामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. येथून प्रधानमंत्री हनुमान गडीच्या दिशेने निघतील. हनुमान गडीच्या दिशेने जाणारा संपूर्ण रस्ता सजवला गेला आहे. हनुमान गढी येथे पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी येथे पाच मिनिटांसाठी पूजा-अर्चा करतील.

यानंतर थोड्याच वेळात राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजन करतील आणि शुभ मुहूर्तावर शिलान्यास करतील. या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक पाहुणे भूमीपूजनास उपस्थित राहतील. आज अयोध्या पुन्हा सजविण्यात आली आहे, संपूर्ण आयोध्यामध्ये आज दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले आहे या बरोबरच सुरक्षा देखील कडक ठेवण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version