माढा, दि.२५ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरातून संपूर्ण भारतात रेल्वे जात असून दिवसेंदिवस रेल्वेचे जाळे मोठे होत असतानाच ट्रॅफिकचा विषय ही गंभीर होत चालला आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने आता भुयारी गेट काढण्याचा घाट घातला असून यामुळे कुर्डूवाडी शहराचे दोन तुकडे होणार आहेत.
कुर्डूवाडीचे दोन तुकडे करणारा भुयारी गेट नको उड्डाणपुलच हवा अशी मागणी रेल्वेकडे रिपाइंने केली आहे. या मागणीचे निवेदन देऊन रिपाइंच्या शिष्टमंडळांनी रेल्वेच्या अभिनेत्यांसोबत बैठक घेतली.
यामध्ये कुर्डूवाडीकरांच्या व्यथा मांडून रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन गेट क्रमांक ३८ वर सुरू असलेल्या भुयारी गेटचे व रेल्वे विद्युतीकरणाचे व काम त्वरित थांबवावे, अशी मागणी रेल्वे अभियंतां एम सौरभ राव यांचेकडे केली. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश जगताप, अरुण माने, कृष्णा आकोरे व रिपाइंच्या कार्यकर्तेनी रेल्वे कडे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील