मुंबई, १२ ऑगस्ट २०२२: खरं तर कपडे ही मुलभूत गराजांपैकी एक मानली जाते. पण यातही आता सिनेअभिनेत्रींची फॅशन ही कायम या गरजांसाठी वावडं निर्माण करत असते. अशीच एक चर्चेतली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. नावाप्रमाणेच तिची फॅशन ही विचित्र आहे.
वास्तविक अंग झाकणं हा कपड्यांचा मुलभूत गुणधर्म आहे. या गुणधर्माकडं उर्फीने पुर्ण दुर्लक्ष केले आहे. केवळ कॅमेऱ्यांना टिपण्यासाठी विचित्र फॅशन करणं, हे ती महत्त्वाचं मानत असल्याने कायम तिचे कपडे हे विचित्र पद्धतीने डिझाईन केलेले असतात, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कधी स्वत:च्या फोटोचे कपडे, तर गोणपाटाचे कपडे, कधी लोकरीचे कपडे, असे विचित्र पोशाख उर्फीने केले आहेत.
उर्फी जावेदच्या पेहरावावरुन अनेकदा वादंग माजल्याचं दिसत आहे. बिलो वेस्ट आणि शरीरातील उत्तान भाग दाखवणं, अशा प्रकारचे तिचे कपडे असल्याने ती माध्यमांसाठी जरी आकर्षक ठरत असली, तरी सिनेसृष्टीत गॉसिपचा मुद्दा झाल्याचं दिसत आहे.
जास्त बोल्ड सीन देऊन कॅमेऱ्यांना व्यस्त ठेवणं या हेतूने उर्फी जावेद इंडस्ट्रीत वावरताना दिसत आहे. मालिंकामधून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या उर्फीला बिग बॉसच्या नवीन सिझनची ऑफर आल्याच्या अफवा होत्या. मात्र मला अशी कुठलीच ऑफर मिळाली नाही, असा नुकताच खुलासा उर्फीने केलाय. सनी लिओनी सारख्या अभिनेत्रीनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आपली मर्यादा सांभाळली. पण उर्फीसारख्या अभिनेत्रीचे वागणे तिच्या करिअरसाठी नक्कीच धोकादायक असल्याचे दिसत आहे.
स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या वागण्या, बोलण्यातून दिसते. त्यात कपड्यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. पण जिथे झाकण्यापेक्षा दाखवणं हे सौंदर्य मानलं जात असेल, तिथे उर्फी सारख्या कलाकारांकडे पाहून सौंदर्याची कीव येते हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस