काळजी करू नका, २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन होणार ही केवळ अफवाच

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: भारतात दररोज ९० हजारांच्या वर कोरोना रुग्ण वाढतायत. त्यामुळे ”रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी सरकारनं २५ सप्टेंबर २०२० पासून पुन्हा एकदा देशभरात लॉकडाऊन करण्याच्या निर्णय घेतलाय.” अशा आशयाचं परिपत्रक गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केलं जातंय. त्यामुळे अनेकजण तणावात आहेत. मात्र हे परिपत्रक खोटं असल्याचं आता समोर आलाय. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातर्फे २५ सप्टेंबर २०२० पासून लॉकडाऊनचा आदेश असलेलं परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार कि काय? या विचारानं लोकं तणावात होते. आधीच आर्थिक स्थिती हालाखीची असताना पुन्हा लॉकडाऊन देशाला परवडणारं नाही असं तज्ञ सांगतात. त्यामुळे लॉकडाऊनची ही बातमी खोटी असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलंय. 

२५ सप्टेंबरला लॉकडाऊन ही अफवाच असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं स्पष्ट केलं आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. पीआयबीनं खुलासा करताना नमुद केलं आहे की पुन्हा लॉकडाऊन अंमलात आणणार अशा आशयाचा कोणताही आदेश पीआयबीमार्फत जाहीर करण्यात आलेला नाही. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा