दारू अथवा बिअर पिणे आरोग्यासाठी चांगले समजले जात नाही. कदाचित याच कारणामुळे आपल्याला दूध पिण्याचे फायदे सांगितले जातात. तर दुसरीकडे पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल संस्थेने (पेटा) दुधापेक्षा बिअर पिणे फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दूधाचे फायदे लहानपणापासूनच सांगितले जातात. यामुळे दररोज लोक १-२ ग्लास दूध पितात. मात्र आता पेटानुसार, दुधापेक्षा बिअर पिणे अधिक फायदेशीर आहे. बिअरमुळे केवळ हाडे मजबूत होत नाहीत, तर त्याचबरोबर आयुष्य देखील वाढते. पेटाने लोकांना दूध न पिण्याचा सल्ला दिला आहे.
एवढेच नाहीतर, पेटाने दुधामुळे होणारे तोटे देखील सांगितले आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, दूध लठ्ठपणा, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे कारण आहे. पेटाने हा दावा हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिपोर्टमध्ये केला आहे. या दाव्याला शाकाहारी असण्याच्या फायद्याशी देखील जोडले जात आहे.
बिअरला एक अल्कोहोल बेवरेज समजले जाते. याला बनविण्यासाठी बाजरी, गहू, मक्का आणि तांदळाचा वापर होतो. याशिवाय बिअरमधील ९० टक्के पाण्या व्यतरिक्त फायबर, कॅल्शियम, आयरनसारखे शरीराला फायदा पोहचवणारे अनेक पोषक तत्व असतात. बिअर मनुष्याची हाडे मजबूत करते. शरीरातील मांसपेशींच्या विकासासाठी देखील बिअर फायदेशीर आहे.
पेटाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बिअर दुधापेक्षा अधिक फायदेशीर आहे. मात्र ते अल्कोहोल युक्त प्रोडक्ट आहे. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक बिअर पिणे देखील धोकादायक आहे.