गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा डॉ. अमोल कोल्हे यांनी केली मोठी घोषणा

डॉ. अमोल कोल्हे यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या आगामी वाटचालीविषयी घोषणा केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे हे सध्या खासदार असल्याने, ते कलाक्षेत्रात काम करणार कि नाही याविषयीचा खुलासा त्यांनी केलेल्या घोषणेमुळे झाला आहे.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, जगदंब क्रिएशन्सच्या अंतर्गत तीन चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशी तीन चित्रपटांची नावं आहे. हे तिन्ही चित्रपट शिवकालीन असणार आहे. त्यातील वाघनखं हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० ला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी ही मोठी घोषणा केल्यामुळे आता निरनिराळ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version