गोल पोस्ट स्पॉटलाइट मालिका विश्‍व ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीत

मुंबई : सोनी सब या लोकप्रिय हिंदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठी भाषेतही बघायला मिळणार आहे.अशी माहिती संबंधितांनी दिली आहे.
या लोकप्रिय मालिकेचे मराठी डब व्हर्जन ‘फक्त मराठी’ या चॅनेलवर सुरु होणार आहे. ‘गोकुलधामची दुनिया’ असं या मालिकेचं मराठी व्हर्जन असणार आहे.
या मालिकेतील जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचे निदर्शनास आल्याने हि मालिका मराठी प्रेक्षकांसाठी मराठीत डब करण्यात येणार आहे. दरम्यान, सदरील मालिका आता आपल्या मातृभाषेत बघायला मिळणार असल्यामुळे मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version