बारामती: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त बारामती शहरात अभिजीत काळे मित्र परिवार व अजितदादा युवा शक्ती महाराष्ट्र प्रदेश याच्या मार्फत तीनशे गरजवंत कुटुंबांना दुध, फळ,भाजीपाला यांचे वाटप करण्यात आले.यावेळी वाटप कोरोना संसर्गाच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या तसेच यावेळी सोशल डिस्टन्स देखील पाळण्यात.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे अनेक कामगारांना काम नसल्याने रोजगार बुडाला आहे. अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन ३ मे पर्यंत लागु केल्याची घोषणा केल्याने हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची आता तर दयनीय अवस्था होऊ लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामतीत
अभिजीत काळे मित्र परिवार व अजितदादा युवा शक्ती महाराष्ट्र प्रदेश याच्या मार्फत ३०० कुटुंबांना दुध, फळ तसेच तसेच आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला देण्यात आला आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक अभिजीत काळे,बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, अँड. वैभव काळे, सुरेश काळे, दिलीप काळे दत्तात्रय काळे. मुगराज काळे ओंकार पवार ईतर मान्यवर उपस्थित होते होते दरम्यान या सामाजिक उपक्रमाचे कौतुक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, तसेच पार्थ पवार यांनी कौतुक केले.
प्रतिनिधी-अमोल यादव