नागपूर १२ फेब्रुवारी २०२४ : जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ.नरेश कोलते यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासातील योगदानाबद्दल थायलंड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.नरेश कोलते हे आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा येथे कार्यकारी प्राचार्य व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील समाजकार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि लेखन कार्यात अमूल्य असा सहभाग आहे. याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत.
५ फेब्रुवारी २०२४ रोजी थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्लोबल आंबेडकरी साहित्य महामंडळातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार थायलंडचे श्री. दीपरत्न, भारत सरकार, दिल्लीचे माजी सचिव के. पी.वासनिक, पुण्याचे श्रीपाद सबनीस, ग्लोबल फाऊंडेशनचे सचिव डॉ. रवींद्र तिरपुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीबद्दल भंडारा येथील आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्कचे अध्यक्ष डॉ. केदारसिंह रोटेले, सचिव कु.काजोल रोटेले, संचालिका सौ.किरणताई रोटेले व त्यांच्या पत्नी, दोन मुलींचे त्यांनी आभार मानले. डॉ.नरेश कोलते यांच्या कामगिरीबद्दल प्रा.अमोलसिंग रोटेले, डॉ.हेमंत देशमुख, डॉ.नंदकिशोर भगत (गुन्हेगारी व सुधार प्रशासन विभागाचे प्रमुख), डॉ.चंदू पाटील( क्रीडा विभागाचे प्रमुख), डॉ.विनोद क्षीरसागर, डॉ.रवी चंदेल, डॉ.चंद्रशेखर मालवीय आदी उपस्थित होते. डॉ.इलियास बेपारी, डॉ.मधुकर निकम, डॉ.सुनील उईके, डॉ.ज्योती नाकतोडे, डॉ.देवेंद्र सोनटक्के, डॉ.सुरेखा पाटील, डॉ.आरती पवार, प्रा.शिवकुमार बावनकुळे, प्राचार्य आम्रपाली भिवगडे, प्रा. बच्छिल, प्रा. गाणार, प्रा.रितेश बावनकर, अधीक्षक दिलीप पटले, राजकुमार ठवरे, इंद्रजित आमटे, पंकज ठाकरे, महेशसिंग सिसोदिया, भूषण टेंभुर्णीकर, प्रतिभा टेंभुर्णीकर, प्रफुल्ल आपटे, सुरेश सातपुते, भाऊदास मालेवार, प्रभाकर मेश्राम, ज्ञानेश्वर दुरुगकर, दिलीप चिमणवार, धीरज बैस ,प्रीती गजभिये या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे