ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाईल्ड यांची नुक्कड़ नाटकाद्वारे पर्यावरण जनजागृती

नागपूर १२ फेब्रुवारी २०२४ : ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाइल्ड प्रोजेक्ट जागृती अंतर्गत, पर्यावरण संरक्षण अभियान या विषयावर नागपूर मधील नेहरू नगर झोन, गांधीबाग झोन, कामठी झोन, लक्ष्मीनगर झोन येथील तब्बल ८० गावामधील गल्ली- मोहल्ल्यामध्ये फिरून नुक्कड़ नाटकाद्वारे जनजागृती करण्यात आली.

आंतरिक वायु प्रदुषण जसे अगरबत्ती, कापुर, लाकड़ी चूल्हा,गोबरी चुलाचा धुरंमुळे होणारे श्वास सम्बन्धी रोग वाढत आहेत. पर्यावरणात घाण पसरत असल्यामुळे टाइफाइड, मलेरिया, सारखे रोग वाढत आहेत. तसेच सिंगल वापर प्लास्टिक मुळे वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुक्या जनावरांचा मृत्यु होत आहे. जमीन नापीक होत आहे. नदी व नाल्यांमध्ये घाण होणे तसेच चोक होणे, हे प्रकार वाढत आहे. प्लास्टिक जाळल्याने विषारी धुर हवेमधे पसरत आहे. ज्यामुळे कैंसर व विविध रोग होत असल्याचे सांगण्यात आले. ओला कचरा व सूखा कचरा कोणत्या डस्टबिनमध्ये ठेवायचा व त्याचे फायदे काय आहेत, प्लास्टिक एकत्रित करून त्याला पण कचरा गाडीत टाकणे गरजेचे का आहे इत्यादी विषय नुक्कड नाटकाद्वारे समजावून सांगण्यात आले. प्रदुषण कमी होण्यासाठी काय उपाय योजना करायची ते सुद्धा सांगितले.

या कार्यक्रमाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्यने उपस्थित राहून त्यांनी ममता संस्थाचे आभार मानले. ममता संस्था प्रोजेक्ट जागृति अंतर्गत पर्यावरण संरक्षण उपक्रम नुक्कड़ नाटक द्वारे राबाविल्याचे सगळ्यानी कौतुक केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिल्ली येथून आलेली नुक्कड़ नाटक टीम ममता हेल्थ इंस्टिट्यूट प्रोजेक्ट जागृतिचे आउटरीच वर्कर, ब्लॉक सुपरवाइजर व राज्य समन्वयक पल्लवी भांडारकार यांनी प्रयत्न केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा