डॉ. बॉम्बचा शेवट आता तुरुंगातच

22

मुंबई : भारतातील खतरनाक दहशतवादी डॉ.जलील अन्सारी ऊर्फ ‘डॉ.बॉम्ब’ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो काही दिवसांपूर्वी २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर आल्यानंतर तो यूपीला पळून गेला होता. त्यानंतर त्याला एटीएसच्या पथकाने पकडून आणले आणि आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.आता त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. लवकरच त्याची रवानगी अजमेर तुरुंगात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भारतात ५२ बॉम्बस्फोटांची मालिका घडवून देश हादरवून टाकणारा हा डॉ.बॉम्ब हा गेल्या २५ वर्षांपासून तुरुंगात आहे.
डिसेंबर महिन्यात त्याला चांगली वागणूक असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा पॅरोल दिला होता. त्यानुसार तो पॅरोलवर मुंबईत आला. परंतु पॅरोल संपण्यास एक दिवसाचा अवधी असताना त्याने यूपीला पलायन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या टीमने त्याला यूपी एसटीएफच्या मदतीने पकडले. सोमवारी ( दि.२०) रोजी त्याला एटीएसच्या विक्रोळी युनिटने मुंबईत आणले.
त्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी जाऊन अन्सारीला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा आर्थर रोड कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली.
आता आर्थर रोड कारागृह अजमेर कारागृहाशी संपर्क साधून त्याचा ताबा घेण्यास सांगितले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून डॉ. अन्सारीला पॅरोल मिळाला होता, परंतु पण त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचा भंग केल्याने यापुढे त्याला पॅरोल मिळणे अशक्यच झाले आहे. त्यामुळे डॉ. बॉम्बचा शेवट आता कारागृहात होणार हे अटळ आहे.