नवी दिल्ली, दि. १९ मे २०२०: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन आज नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ७३ व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) महासंचालकांनी केलेल्या भाषणावर डॉ. हर्षवर्धन यांनी भारताची दिलेली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे :
“जागतिक आरोग्य परिषदेचे अध्यक्ष महामहीम केवा बेन, डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस आणि मान्यवर,
सर्वप्रथम मी, कोविड-१९ मुळे संपूर्ण जगभरात झालेल्या जीवितहानिबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो. जे लोक आघाडीवर राहून ही लढाई लढत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
आम्ही, भारतामध्ये कोविड-१९ च्या आव्हानाला राजकीय वचनबद्धतेच्या सर्वोच्च पातळीवर स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यास कोणतीही कसर राहू नये म्हणून वेळेवर, सक्रीय आणि श्रेणीबद्ध प्रतिक्रिया सुनिश्चित केल्या.
भारताने वेळेवर योग्य ती पावले उचलली, ज्यात प्रवेशाच्या ठिकाणी संनिरीक्षण करणे, परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी घेऊन येणे, निकोप आजार संनिरीक्षण ठेवण्याच्या नेटवर्कद्वारे मोठ्या प्रमाणात समुदाय संनिरीक्षण ठेवणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, दोन दशलक्षांपेक्षा अधिक आघाडीच्या मनुष्यबळाची क्षमता वाढवणे, जोखीम संप्रेषण आणि समुदाय सहभाग याचा यात समावेश आहे. मला असे वाटते की आम्ही आमचे सर्वोत्तम कार्य केले आहे. आम्ही शिकत आहोत आणि आगामी काही महिन्यांमध्ये आम्ही अधिक चांगले काम करू यावर आमचा विश्वास आहे.
महामहीम, आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की आपल्या सगळ्यांना अशा आभासी पद्धतीने भेटणे भाग पडले आहे. ७३ वी डब्ल्यूएचए ही पहिलीच आभासी आरोग्य परिषद आहे, ती अभूतपूर्व आहे, परंतु कदाचित ही आतापर्यंतची सर्वात महत्वाची परिषद देखील आहे; कारण आपण येथे बसून चर्चा करीत असताना, देखील हा साथीच्या आजार हजारो लोकांचे जीव घेत आहे आणि यामुळे मोठ्याप्रमाणात जागतिक मंदीही उद्भवू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी