गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय डॉ. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्याहस्ते होणार गौरव

डॉ. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्याहस्ते होणार गौरव

मुंबई : कुष्ठ रोग्यांना देव म्हणून सेवा करणारे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा त्यांनी केलेल्या आरोग्यसेवेतील योगदानासाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय तसंच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स या तिघांचा राजधानी दिल्लीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करतील. आमटे दांपत्याला याआधी प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे

error: Content is protected !!
Exit mobile version