गोल पोस्ट राष्ट्रीय अयोध्या निकाल: पुनर्विचार याचिका दाखल करणार

अयोध्या निकाल: पुनर्विचार याचिका दाखल करणार

अयोध्या : अयोध्या प्रकरणावरील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे.
याबाबत ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाची आज (रविवारी)बैठक झाली. या बैठकीत सुन्नी वक्फ बोर्डाला नवी पर्यायी मशीद बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय मान्य नसल्याचे म्हटले आहे.
तसेच, या प्रकरणाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या याचिकेवर कोर्ट कितपत विचार करते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version