नवी दिल्ली, दि.२० मे २०२०: जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. या निवडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २२ मे पासून ते ही जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
भारताला देशाच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याबाबत जवळपास १९४ देशांचे एकमत झाले. तशा सह्या या प्रस्तावावर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्याने खाजगीत दिली आहे. पुढील तीन वर्षांसाठी भारताची कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत पि टी आय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
क्षेत्रीय समूहामध्ये एक वर्षासाठी कार्यकारी मंडळाचे हे पद रोटेशन पद्धतीने देण्यात येते.२२ मे पासून पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २२ मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.अशी माहिती देण्यात आली आहे.
जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा आता डॉ. हर्षवर्धन घेणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: