पदवीधर निवडणूक प्रचारात डॉ.श्रीमंत कोकाटे आघाडीवर

माढा दि.२३, ऑक्टोबर २०२० :पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांचा कालावधी जुलै २०२० मध्ये संपलेला आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती.आत्ता कोरोनाचा जोर ओसरल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी आपली तयारी सुरू केलेली आहे.प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे.मतदारसंघ मोठा आहे.पाच जिल्हे म्हणजेच अठ्ठावन्न तालुके असे कार्यक्षेत्र या मतदार संघाचे आहे. आत्तापर्यंत या प्रचारात डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.पदवीधर उमेदवार डॉ.श्रीमंत कोकाटे व त्यांच्या समूहाने ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जुलै २०१९ पासून जवळपास जानेवारी २०२० पर्यंत शाळा,महाविद्यालय,न्यायालय, संस्था,संघटना,डॉक्टर सेल,वकील बारसह विविध क्षेत्रातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी मंडळींना भेटून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

गेल्या २५ वर्षांपासून डॉ.कोकाटे यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष भावनेने बुद्ध,जिजाऊ,तुकोबाराय, शिवराय, फुले,शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ,अहिल्याबाई,
फतमाबीबी,संत रोहिदास,संत नामदेव,संत बसवेश्वर इ.अनेक बहुजन महापुरुषांच्या जीवनचरित्रांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील सामान्य जनतेशी त्यांचे जिवाभावाचे संवेदनशील नाते तयार झाले आहे.तरुण वर्गात त्यांना मोठा आदर आहे.समाजातील बुद्धिजीवी वर्गातून डॉ.कोकाटे यांना उल्लेखनीय प्रतिसाद आहे.

आज महाराष्ट्रात बहुजनवादी पुरोगामी चळवळीत मोठे प्रबोधन झाले. मराठा,कोळी,माळी, धनगर,सुतार,लोहार,कुंभार,
चर्मकार,मातंग,बौद्ध,मुस्लिम, रामोशी,वडार,शिंपी,लोणारी,वंजारी इ.अनेक जातीमध्ये जातीय सलोखा राखण्याचे मोठे कार्य अनेक पुरोगामी संघटनांनी केले आहे.त्यामध्ये डॉ.कोकाटे यांचा मोठे योगदान आहे.त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने अनेक वक्ते तयार झाले आहेत.सोलापूर ते दिल्ली व दिल्ली ते दुबई असा प्रबोधनासाठीचा मोठा पल्ला त्यांनी पार केला आहे.आज ते पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार तयारीनिशी गाठीभेटी घेत आहेत.सर्वच पक्षातील अनेक नेत्यांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. सर्वमान्य चेहरा,निष्कलंक चारित्र्य,अफाट लेखन,वाचन,संशोधन,प्रबोधन,प्रचंड मेहनती,चौफेर अभ्यास,कार्यकर्त्यांचे मोठे जाळे ह्या त्यांच्या प्रमुख जमेच्या बाजू आहेत.

या निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने आपली तयारी चालू केली आहे.परंतु उमेदवार मात्र अद्याप जाहीर केले नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून अरुण लाड व डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.या दोघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा