Commonwealth Games 2022 Ind Vs Aus Final, ८ ऑगस्ट २०२२: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ९ धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावले, तर टीम इंडियाला रौप्यपदक मिळाले. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावरील अंतिम सामना शेवटच्या षटकात गेला, पण ऑस्ट्रेलियाने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य भारताला गाठता आले नाही.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १६१ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांना केवळ १५२ धावा करता आल्या. टीम इंडियाच्या वतीने कर्णधार हरमनप्रीत कौरने ६५ धावांची कर्णधारी खेळी करत संघाला एका बाजूने रोखून धरले. मात्र दुसरीकडे कोणीही उभे राहू शकले नाही आणि शेवटी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.
भारताची तिसरी विकेट 118 च्या स्कोअरवर पडली आणि त्यानंतर संपूर्ण टीम १६२ च्या स्कोअरवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने शेवटच्या ६ षटकात सात विकेट गमावल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या ४३ चेंडूत ६५ धावा केल्या, याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने ३३ चेंडूत ३३ धावा केल्या.
याशिवाय सर्व फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाची सलामीची जोडी शेफाली वर्मा (११) आणि स्मृती मानधना (६) यावेळी अपयशी ठरल्या आणि त्याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे