गोल पोस्ट समाजकारण वाढदिवसाचा खर्च टाळून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वाढदिवसाचा खर्च टाळून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

इंदापूर, ७ फेब्रुवरी २०२१: ‘फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब’ इंदापूर तालुक्यातील निमगाव किती येथील प्रसिद्ध वकील सचिन राऊत यांनी  व्याहाळी रोड वरील पाण्याच्या टाकी नजीक वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी सोडले.

या कार्यक्रामासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व  डॉ.इनामदार हे  उपस्थित राहीले. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका सायकल क्लब चे सर्व सदस्य, नगरसेवक  तसेच वन्य  प्रेमी  मंडळी, सावता  परिषदेचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, सर्व वकील मंडळी, जवळचे  मित्र, अधिकारीवर्ग, वनविभाग उपस्थित होते.

जन्मदिवस व इतर कार्यक्रमाचे वायफळ खर्च टाळुन आपण त्या पैकी काही रक्कम वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी खर्च करावे असे आवाहन फ्रेंन्डस ऑफ नेचर क्लबच्या वतीने करण्यात आले.

आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कौतुक केले व असेच समाज उपयोगी कामे करावे ही विनंती केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version