नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2021: एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी गुरुवारी तामिळनाडूतील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातस्थळी भेट दिली. कुन्नूरमध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. या अपघाताच्या चौकशीसाठी हवाई दलाने एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्रि-सेवा (ट्राई सर्विस)समिती स्थापन केली आहे.
दुसरीकडे, तामिळनाडू पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूचे डीजीपी शैलेंद्र बाबू यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. याशिवाय कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी ड्रोन मॅपिंग केले. एअर मार्शल मानवेंद्र सिंह अधिकाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते की, एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी सेवेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, निलगिरी पोलिसांनीही याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. आणि एडीएसपी मुथुमनिकम यांना तपास अधिकारी करण्यात आले आहे.
सीआरपीसी कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. अपघात किंवा आत्महत्येच्या प्रकरणात CrPC कलम 174 नुसार नोंद केली जाते. पोलिसांनी तपासासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर केला आणि आजूबाजूच्या परिसराचे चित्रीकरणही करण्यात आले.
डीजीपी सी शैलेंद्र बाबू यांनी तपासासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीला फॉरेन्सिक अधिकारीही उपस्थित होते. या प्रकरणात आतापर्यंत 26 प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे