आज वरळी येथे ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरुवात

मुंबई, २२ जून २०२० : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी संपर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तीन वेळा वाढलेला हा लॉकडाऊन ३ जून पासून काही अटींवर शिथिल करण्यात आला.

अनलॉक १ मध्ये काही ऑफिसेस, बाजारपेठा , दुकाने व काही कंपन्यांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, यात प्रत्येक गोष्ट निर्जंतुक करण्यास सांगण्यात आली तसेच सुरक्षित अंतर ठेवून व तोंडाला मास्क लावून काम करणे ही समाविष्ट आहे.

परंतू याच बरोबर आता पावसाळाही सुरू झाला असल्याने डासांचे प्रमाण ही वाढते याच साठी शिवसेनेचे आ. व राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून आज वरळी येथे ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरुवात झाली. माणसाला प्रवेश करण्यासाठी कठीण असेल अशा ठिकाणी डासांच्या प्रजनन स्थळांचे हवाई निर्जंतुकीकरण करण्यास याची मदत होणार आहे. मागील आठवड्यात ड्रोन सर्वे पूर्ण करून व्हिक्टर बोर्न डिसीज् (Vector Borne Disease) नियंत्रित करण्यासाठी हे निर्जंतुकीकरण केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा