ठाण्यात १० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, एकाला अटक

ठाणे, ८ ऑगस्ट २०२३ : ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे ५२ ग्रॅम प्रतिबंधित ड्रग मेफेड्रोन जप्त केले असून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मीरा-भाईंदर- वसई विरार पोलिसांच्या सेंट्रल क्राईम युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल राख यांनी ही माहिती दिली आहे.

नियमित गस्तीदरम्यान शनिवारी पोलिसांच्या पथकाला भाईंदर परिसरातील गावदेवी मंदिर रोडवर एका व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसली. तेव्हा पोलिसांनी त्याला थांबवले आणि झडतीदरम्यान त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे ५२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अंकित भरत जाधव असे आरोपीचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ड्रग्ज कोठून आणले आणि तो कोणाला विकायचा हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा