पवन मावळात चारसूत्री प्रकल्पानुसार दोन हजार हेक्टरवर भात लागवड

वडगाव मावळ,पुणे ८ ऑगस्ट २०२३ : पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीसाठी मावळ तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी काले काॅलनी यांच्या वतीने पवन मावळ भागातील १० हेक्टर क्षेत्रावर व २५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात/ चारसूत्री भात लागवड प्रकल्पांतर्गत झिंक सल्फेट व कामगंध सापळे वाटप करुन मार्गदर्शन करण्यात आले.

मळवंडी ठुले येथे कृषी विभागाकडून चारसूत्री पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात असून चारसूत्री प्रकल्पातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर एक एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी भात बियाण्यास बीजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपवाटीका करुन दोरीच्या सहाय्याने १५ बाय २५ से.मी अंतरावर भात लागवड केल्या आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे, झिंक सल्फेट, भात प्रात्यक्षिक प्लॉटला ३० कामगंध देण्यात आले आहे, असे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा