मुंबई,१० ऑगस्ट २०२०: नवी मुंबई पोर्टवर अफगानिस्तान वरून भारतात आलेल्या अमली पदार्थाचे एक मोठे खेप जप्त करण्यात आले आहे. अंदाजे या अमली पदार्थाचे बाजारात भाव १००० करोड इतके आहे. या अमली पदार्थला प्लास्टिकच्या पाईप मध्ये भरून, पाईपला बांबू सारखे रंगवणियात आले होते.
कस्टम विभागाचे अधिकारी आणि डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआई) यांनी जेंव्हा अमली पदार्थ पकडले हे आयुर्वेदिक औषध आहे असे आरोपीने सांगितले. लपून आणण्याविषयी विचारल्यास औषध खराब होऊ नये म्हणून असे आणले असल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांकडून सक्तीने विचारल्यास अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट केले. कार्यवाही करण्याच्या वेळेस अमली पदार्थ इम्पोर्टचे कागदपात्र बनवणाऱ्या दोन कस्टम एजन्टला मुंबई व एक इंपोर्टर आणि फाइनेंसरला दिल्ली वरून अटक करण्यात आली.
कस्टम एजेंट मीनानाथ बोडके आणि कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाल याना अटक करून स्थानिक न्यायालयात नेण्यात आले असता न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे ड्रग्स रैकेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी