नवी मुंबईत १८.०५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, २ नायजेरियन नागरिकांसह ३ जणांना अटक

ठाणे, २५ जुलै २०२३ : नवी मुंबई पोलिसांनी दोन छाप्यांमध्ये १८.०५ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून याप्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांसह तिघांना अटक केली आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) खारघर रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ३२ आणि ३४ वयोगटातील दोन नायजेरियन पुरुषांना अटक केली.

नायजेरियन व्यक्तींकडून ४.४० लाख रुपये किमतीचे, एकूण ४४ ग्रॅम ‘मेथाक्वॉलोन’ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुसऱ्या प्रकरणात, एएनसीने एपीएमसी पोलीस स्टेशन परिसरात छापा टाकला आणि एका व्यक्तीला अटक केली. ज्याच्याकडून २.६० ग्रॅम एलएसडी जप्त करण्यात आला असुन त्याचा बाजारभाव १३.६५ लाख रुपये आहे.

नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या तरतुदींनुसार सोमवारी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी अमली पदार्थ कोठून आणले आणि ते कोणाला विकायचे होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा