मुंबईत मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज, महिलेसह 2 तस्करांना अटक

4

मुंबई, 9 एप्रिल 2022: मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने 5 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यासोबतच महिलेसह 2 आरोपींनाही अटक करण्यात आलीय. विशेष बाब म्हणजे आरोपी मुलांच्या पाण्याच्या बाटलीत ड्रग्ज लपवून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने मानखुर्द परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 किलो 935 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलंय. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 5 कोटी 80 लाख रुपये आहे.

पाण्याच्या बाटलीत लपवले होते ड्रग्स

गुन्हे शाखेने आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. अंमली पदार्थांची तस्करी करणारे हे धूर्तपणे तस्करी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये हेरॉईन ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गुन्हे शाखेने दोघांनाही अटक केली.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला अनेक दिवसांपासून अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेली होती. गेल्या सहा महिन्यांपासून तिचा शोध सुरू होता. क्राईम ब्रँचने महिलेला अटक केली तेव्हा तिच्याजवळ पाण्याच्या बाटलीसोबतच शाळेची बॅगही सापडली. यातून ती पोलिसांची दिशाभूल करत असे. गुन्हे शाखेने पाण्याची बाटली उघडली असता त्यात 1 किलो 935 ग्रॅम हेरॉईन आढळून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा