गोल पोस्ट अर्थ गुंतवणूक ‘डीएसके’च्या ठेवीदाराची आत्महत्या

‘डीएसके’च्या ठेवीदाराची आत्महत्या

पुणे : मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक म्हणून ‘डीएसके’कडे गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने पुण्यात एका व्यक्तीने आत्महत्या गेल्याची घटना घडली आहे.
अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने चौथ्या मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेतून आत्महत्या करत असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे.

घोरपडी येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या तानाजी गणपत कोरके (वय ६०) यांनी गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने आपले आयुष्य संवल्याचे पात्रात नमूद केले आहे.
‘मृत्यूनंतर आत्महत्येस ‘डीएसके’यांना जबाबदार धरून पोलीस खात्याने किमान माझ्या कुटुंबियांना तरी पैसे मिळवून द्यावेत. अशी विनंती पत्रात त्यांनी लिहिली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version