डी. एस.कुलकर्णी यांच्या संपत्तीचा होणार लिलाव

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. तसेच सक्तवसुली संचालनालय व राज्य सरकारने डीएसकेंच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असंही या आदेशात सांगण्यात आलं आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांची पत्नी सध्या तुरूंगात आहेत.

डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या एकूण ४६३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात स्थावर आणि जंगम मालमत्तांचा समावेश आहे. २००० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप डीएसकेंवर ठेवण्यात आलेला आहे.
कर्जदात्या बँकांसह सुमारे ३३,००० गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे ठेवीदार तसंच बँकांचे पैसे परत मिळावेत, यासाठी डीएसकेंच्या जप्त संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हरकती नोंदवण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान डी. एस. के त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तेरा आलिशान गाड्यांचा येत्या १५ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे.
डीएसके यांच्याकडील ४६ पैकी २० वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतके आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा