डीएसपी अतुल सोनी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : पंजाब पोलिसांतील सिंघम नावाने ओळखल्या जाणाऱ्या डीएसपी अतुल सोनी यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीएसपी अतुल सोनी यांच्वयावर असा आरोप केला जात आहे की, सोनीने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही.
दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने डीएसपी सोनी इतका संतप्त झाला की त्याने पत्नीवर गोळी झाडली. मात्र, यात पत्नी थोडक्यात बचावली. झाडलेली गोळी डोक्याच्या वरच्या बाजूस गेली त्यामुळे पत्नीचा जीव वाचला

हल्ल्यानंतर डीएसपीच्या पत्नीने मोहालीच्या स्टेशनच्या फेज ८ मध्ये तिच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अतुल सोनीने त्याच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरवरून नव्हे तर बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरवरून गोळी चालविली असल्याचा आरोप आहे. सोनीच्या पत्नीनेही या घटनेत वापरलेली शस्त्रे आणि काडतुसे पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा