सततच्या जोरदार पावसाने शेतात पिके लागली सडू

माढा, दि. २७ जुलै २०२०: गेली २० ते २२ दिवस झाले संपूर्ण माढा तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाऊ लागली आहेत. तर पेरणी केलेली लागवड केलेली केळी, मका, ऊस, डाळिंब, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, चुका, शेपू, कांदा अशा सर्व प्रकारच्या पिके व फळे सततच्या पावसामुळे पाणी जास्त झाल्याने शेतात पिवळी पडून सडून जाऊ लागली आहेत. उजनी (टे), शिराळ, आडेगाव, टेंभुर्णी, अकोले, कंदर, रांझणी, माळेगाव, शेवरे, आलेगाव खुर्द, आलेगाव बुद्रुक या गावांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

कोरोना मुळे व सततच्या लॉक डाऊन मुळे मार्केट कमिट्या बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे. शेतकरी मात्र सगळीकडून भरडला गेला आहे. शेतीशी निघडीत जोडधंदा एकमेव आहे तो म्हणजे दूध व्यवसाय तोही दुधाला १८ ते २० रुपये दर झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

त्यातच गेली महिनाभर तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे. बळीराजाने उसनवारी, कर्ज, सोसायट्या काढून झोपलेली पिके जोरदार पावसाने शेतात सडून जाऊ लागली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जावू लागली असल्याने प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून मदत द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा