पैठण: कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथे दरवर्षी होणारा श्रीनाथ षष्ठी महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. असा अध्यादेश मंगळवारी (दि.१०) रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आला.
नाथषष्ठी हा वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा मानला जातो. जवळपास आठ ते दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असतो.
संत एकनाथ महाराजांच्या स्मृतीनिमित्त नाथषष्ठी हा सोहळा जवळपास पंधरा दिवस साजरा केला जातो.
दरम्यान, १४ मार्चला षष्ठी महोत्सवाला सुरवात होणार होती. मात्र, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.