रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक हबमुळे, पुणे शहरात घरांची विक्री वाढली

पुणे,३० जून २०२३ : प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते. वाढत्या शहरीकरणाने शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण वाढत आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये घरांना मोठी मागणी आहे. एकीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदारात कपात केली जात नाही.तरीही घरांची मागणी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत देशात ८० हजार २५० घरांची विक्री झाली आहे. त्यात सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे.शहरात घर घेणाऱ्यांचा कल दिवसंदिवस वाढत आहे. पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. रोजगाराच्या अनेक संधी पुणे शहरात उपलब्ध आहे. तसेच शिक्षणाचे हब म्हणून पुणे शहराची ओळख आहे. यामुळे पुणे शहरात घर घेण्याचा कल वाढत आहे.

भारतात एप्रिल ते जून या तीन महिन्यात घरांची विक्री मागील वर्षापेक्षा वाढली आहे. २०२२ मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ७४ हजार ३२० घरांची विक्री झाली होती. २०२३ मध्ये ८० हजार २५० घरांची विक्री झाली आहे. देशातील आठ मेट्रो शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे तर काही शहरांमध्ये कमी झाली आहे. त्यात सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे. ब्रोकरेज फर्म प्रॉपटायगरने यासंदर्भात एक माहिती जारी केली आहे.

२०२३ मधील पहिले तीन महिने मुंबई,पुणे,अहमदाबादमध्ये घरांची विक्री वाढली आहे. त्याचवेळी दिल्ली- एनसीआर, बेंगळुरु, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकत्यामध्ये घरांची विक्री कमी झाली आहे. देशात आठ मेट्रो शहरांमध्ये निवासी प्रकल्प योजनांमध्ये चांगली वाढ होत आहे. आरबीआयकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी केले जात नसतानाही घरांची विक्री वाढत आहे. अहमदाबादमध्ये १७ टक्के घरांची विक्री वाढली आहे. पुणे शहरात सर्वाधिक ३७ टक्के वाढ झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा