टाटा मोटर्सकडं थकबाकी मात्र, नोटीस नाही; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची माहिती

पिंपरी, २५ मार्च २०२३: निवासी व बिगरनिवासी थकबाकीदार असणाऱ्या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १४८ कोटी ९३ लाखांचा मालमत्ताकर थकित आहे. कंपनीला पालिकेने कोणतीही नोटीस दिलेली नाही. पालिका या प्रकरणी समन्वयाची भूमिका घेत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्याबाबत तोडगा काढला जाणार आहे, असं आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलंय.

बैठकीमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की, सन २००० सालापासून पालिकेने खुल्या जागांना नियमानुसार कर लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार टाटा मोटर्स कंपनीच्या पालिका भवन, चिंचवड आणि चिखली करसंकलन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांना मालमत्ताकर आकारण्यात आला. त्यानंतर कंपनीने याबाबत विविध न्यायालयात दाद मागितलीय.

तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना यावर्षी विभागाकडून मिळकत कर बिलं बजावण्यात आले असून, त्यांना अधाप कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त स्तरावर दोन बैठका झाल्या आहेंत. न्यायालयीन प्रक्रिया व लढाई यात उभयपक्षी खर्च होणारा पैसा, ऊर्जा व त्यामध्ये वेळीची बचत व्हावी, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असं पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा